Posts

Showing posts with the label #मन

प्रवास......

Image
भुतकाळातील आठवणींच्या विजनवासात गेलेले  मन नव्या आशेने पुन्हा एकदा पुलंकित होते, नवी उभारी घेते..आपण आनंदी  आहोत हे उगाचच स्वत:लाच मन समजावून सांगते.. पुन्हा एकदा स्वप्नांची नव्याने जमवाजमव सुरु होते..पुन्हा तोच खेळ मन नव्याने खेळायला लागते ...प्रत्येक वेळी आपण फसतो हे त्याला माहिती असूनही.            मेंदूला  क्षितीज  असते,पण मन शितीजापलीकडे  जाऊन पोहचते..वेदना, अपेक्षाभंग, मनस्ताप यांचे प्रचंड ओझे घेऊन मन पुन्हा पुन्हा आनंदाने मिरवत असते..नात्यांची तुटलेली  श्रुंखला पुन्हा एकत्र गुंफण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हाती निराशा येत राहते..            नवी नाती, नव्या नात्यातील आपलेपणाची तुलना तुटलेल्या नात्याची नकळत  होत राहते..त्या नव्या नात्याचा काहीही दोष नसताना आपले मन त्या नव्या नात्याचा अपमान करत राहते..          विहिरीमध्ये कोंडलेल्या मांजरीसारखी अवस्था..कितीही बाहेर येण्याच्या प्रयत्न केला तर...