समस्यांच्या नव खाणाखुणा
सामान्य माणसाचे जगणे अवघड समस्यांच्या नव खाणाखुणा माणुस बनला बापुडवाणा वेदना अनेकाशी ! प्रामाणिकतेला मिळतो धडा लबाडीला मोठेपणा केवढा फोडुनी चारित्र्याचा घडा तुडवले तत्वाशी ! उधळे येथे लक्ष्मीपुत्र मनी त्यांच्या उपभोगाचे सूत्र श्रीमंताचीच मस्ती सर्वत्र कलयुगा जैसी ! पक्षा गणती एक नेता बनला स्वाताचाच भाग्यविधाता जनतेची कोण चिंता वृत्ती स्वर्थाशी ! कळेना काय खोटे काय खरे कोणा सांगावे कोणा बोलावे सगळेच झाले ढोंगाचे सोयरे बुडाले पतनासी ! हे काय कमी म्हणून महागाई रोज येथे नूतन मध्यमवर्गीय झाला दिन दारिद्रा साजेशी ! गोंधळा जीव थोर लहान कसे धारेल तो अवसान सारेच झाले दुखी एक समान असाध्य सुखाशी ! देवा आता तुच सोडव हा गोंधळ तोडुनी बनावटीचे हे मृगजळ ओढून आण जनतेशी बळ लढाया संकटाशी !