समस्यांच्या नव खाणाखुणा

सामान्य माणसाचे जगणे अवघड 
समस्यांच्या नव खाणाखुणा 
माणुस  बनला  बापुडवाणा 
वेदना  अनेकाशी !

प्रामाणिकतेला मिळतो धडा 
लबाडीला मोठेपणा केवढा 
फोडुनी चारित्र्याचा  घडा
तुडवले तत्वाशी  !

उधळे येथे लक्ष्मीपुत्र 
मनी त्यांच्या उपभोगाचे सूत्र 
श्रीमंताचीच  मस्ती सर्वत्र 
कलयुगा  जैसी  !

पक्षा गणती एक नेता 
बनला स्वाताचाच भाग्यविधाता 
जनतेची कोण चिंता 
वृत्ती  स्वर्थाशी !

कळेना काय खोटे काय खरे 
कोणा सांगावे कोणा बोलावे 
सगळेच  झाले ढोंगाचे सोयरे 
बुडाले  पतनासी  !

हे काय कमी म्हणून 
महागाई रोज येथे नूतन 
मध्यमवर्गीय झाला दिन 
दारिद्रा साजेशी !

गोंधळा जीव थोर लहान 
कसे  धारेल तो अवसान 
सारेच  झाले दुखी एक समान
असाध्य सुखाशी !

देवा आता तुच सोडव हा गोंधळ
तोडुनी बनावटीचे हे मृगजळ 
ओढून आण जनतेशी बळ
लढाया संकटाशी ! 

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल