पुरोगामी मुळव्याध

★पुरोगामी मुळव्याध★

ज्याप्रमाणे खूप प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाण्यात आले की मनुष्याच्या शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत जाऊन,त्या वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर मुळव्याधामध्ये होते, अगदी त्याचप्रमाणे भारतातील  काही लोकांचा मोदी द्वेष हा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की त्या लोकांच्या ढुंगणाला पुरोगामीपणाचे इंद्रधनुष्यी मुळव्याध झाले आहे. या इंद्रधनुष्यी मुळव्याधाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य  हे असते की हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू सण उत्सव आणि हिंदू रीतीरिवाज या संबंधित कोणताही विषय आला की या पुरोगामी लोकांचे  पुरोगामीतत्व लाभलेले मुळव्याध ठणठणायला लागते.
    मनुष्याने विज्ञानवादी असावे वगैरे सर्व काही प्रमाणात ठीक आहे... चुकीच्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत हे देखील कोणीही नाकारणार नाही.... आक्षेप या गोष्टीवर आहे की तुमचा सगळा विज्ञानवाद फक्त हिंदू धर्माबाबतच कां उफाळून येतो?
       हिंदू धर्मात जात व्यवस्था आहे हे विदारक सत्य कोणीही नाकारत नाही. जात व्यवस्था हा हिंदू धर्माचा भाग कधीच नव्हता.जात व्यवस्था ही संपूर्णपणे मानवनिर्मित व्यवस्था आहे. जी मनुष्याने स्वतःच्या हितासाठी निर्माण केली आहे....
       आता जात व्यवस्था ही फक्त हिंदू धर्मामध्ये आहे कां?...तर  त्याचे उत्तर आहे अजिबात नाही...जगातील एकही असा धर्म नाही ज्यामध्ये वेगवेगळे पंथ नाही.बौद्ध धर्म,इस्लाम, ख्रिश्चन, जैन,शीख या धर्मांमध्ये देखील अनेक पंथ आहेत,अनेक गट आहेत. फरक इतकाच आपण जात म्हणतो ते पंथ म्हणतात. इस्लाम धर्मात खूप पंथ आहेत.... आणि  लिंगायत हा धर्म नाही तर हिंदू धर्मातील पंथ आहे.
      भारतातील पुरोगामी हा फक्त एक विचार नाही तर एक रोगट विचारसरणी आहे. या रोगट मानसिकतेच्या लोकांना सगळे दोष फक्त हिंदू धर्मामध्ये दिसतात.यांचे विज्ञानवादी सगळे निकष फक्त हिंदू धर्मातील रितीरिवाज यांच्यासाठी राखीव असतात.
        कोणतीही गोष्ट एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत दाबली की स्प्रिंगसारखी अधिक वेगाने परत येते.भारतातील पुरोगामीपणाचे तेच झाले. सातत्याने हिंदू धर्मातील गोष्टींनाच टारगेट केल्याने सामाजिक सुधारणा होण्याऐवजी भारतात हिंदुत्ववाद प्रचंड वेगाने वाढला. पुरोगामी लोकांच्या ढोंगीपणामुळे हिंदू धर्मातील लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड निर्माण होऊन त्याचे प्रत्यंतर मोदी ही हिंदुत्ववादी व्यक्ती देशाचे पंतप्रधान होण्यात झाले.एका अर्थाने आपण असे देखील म्हणू शकतो की नरेंद्र मोदी नावाच्या हिंदुत्ववादी व्यक्तीला हिंदुत्ववादी लोकांपेक्षा देशातील पुरोगामी मंडळींच्या हिंदू द्वेषाने देशाचा पंतप्रधान बनवले.नरेंद्र मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेमध्ये जर कुणी सर्वाधिक योगदान दिले असेल तर ते देशातील पुरोगामी लोकांनी.
  येऊन जाऊन हिंदू धर्मातील सण-उत्सव आणि परंपरांना नावे ठेवायची,त्यांच्यावर टीका करायची हाच या पुरोगामी लोकांचा आवडता उद्योग.इतर धर्मातील चुकीच्या अंधश्रद्धांबद्दल या पुरोगामी लोकांच्या थोबाडातून कधी एक शब्द निघत नाही.या लोकांच्या अशा प्रकारच्या ढोंगीपणामुळेच या लोकांना देशात कुणी कवडीची किंमत देत नाही आणि यापुढेही कुणी कधी किंमत देणार नाही.

Popular posts from this blog

I love Pune Traffic....

सुखाची ओंजळ