घर

हास्याच्या हिंदोळ्यात  रमते 
अश्रूंच्या पाण्याने भिजते 
मायेच्या ओलाव्यात सुखावते 
आणि सुख-दुखामध्ये देखील आनंदाने जगते ते  घर 


आईच्या हास्यावर हसते 
ताईच्या लोभावर भाळते 
वडिलांच्या  यशावर गर्वते 
आणि भावनेवर धडधाकट उभे राहते ते  घर 


बाळाच्या  बाललीलामध्ये  खेळते 
कन्यादानाला आसवे बांधते 
दादाच्या लग्नाला खुलते 
आणि परदेशी गेल्यावर जे आठवते ते घर 


अग्नीने जळू  शकत नाही 
संकटाने पडू शकत नाही 
स्वार्थाने मोडू शकत नाही 
 आणि आयुष्भर साथ करते ते  घर



Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....