ग्रीष्म दुपार

दारात  उभी ग्रीष्म  दुपार 
पसरून हाथ  तप्त सूर्याचे 

उष्ण हवेच्या ज्वालेला साथ 
उभ्या आडव्या तप्त स्वरांची 
लाही उठे सर्व कणी 
शुष्क  माती तृष्णा जलाची 

नितळ  छाया  विसरून 
सावली  उदासानातेने  उभी  झाडांपाशी 
न हले  आज फुल पाने 
लपले जणू तेही आपल्याच कोषासी 
  
वेश उभी अंतराची एकटी
शोधीत वाटसरुची  चाहूल 
पण का कुणास ठावूक 
पायवाट हि झाली अनोळखी त्यास 

  

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....