ओंजळीतील क्षण.....

ओंजळीतून क्षण  सांडून गेले की  ते आठवणीतले  मोती बनतात .....क्षणच  ते क्षण भुंगरता हा  त्यांचा स्थायीभाव ...त्या आठवणीतील  मोत्यांची  माळ पुन्हा विणायचे म्हटले तरी पुन्हा त्या माळेला  पूर्वीची सुंदरता लाभत नाही .....कदाचित  ती  सुंदरता त्या माळेला  लाभातही  असेल पण मन वेडे त्या क्षणांची 
आतच्या वर्तमानातील क्षणासंगे तुलना करत राहते .....आणि  मग  हाती येते ती केवळ हुरहूर 
....सकाळी गवतावर पडलेल्या  निष्पाप  दवबिंदू सारखे क्षण असतात ...आपण त्या  दवबिंदूला स्पर्श केल्यावर जसे त्याचे क्षणात पाणी होते तसेच क्षणांचे  देखील   वर्तमानाचा स्पर्श झाला की त्या क्षणाचे  पुढच्या क्षणी  आठवणीत रुपांतर होते

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल