विचार..कधी खरे तर खुपदा आभासी..

एक ना अनेक विचार.. एकमेकांचे बोट धरून एकामागून एक चालणारे  विचार..कधी खरे तर खुपदा आभासी.. 
     मनाने मनाशीच खेळ करत निर्माण केलेले  विचार..त्याला  न कुठला  सीमांत न कुठले  क्षितीज..!
       स्वताचा शोध घेणे ठरवले तरी आपल्याला चकवा देत  विचार कुठल्याही एका वळणावर ठाम राहत नाही..क्षणात निर्णयापर्यंत  पोहोचणार तर कधी  पुन्हा  नव्याने  सुरुवात करणार..
         आपल्याला  नक्की कोण  फसवते..? आपले मन कि आपले  विचार..? मन आणि विचार भिन्न  भिन्न..मन  विचारांचा आदर करते  पण विचार कधीच कोणाच्या मनाचा आदर करताना दिसत नाही..हर्षाचे, निराशेचे, मत्सराचे, हेव्याचे, उदासिनितेचे, गर्वाचे, अहंकाराचे..
सर्व प्रकारचे  विचार सतत मनावर हल्ले  करतात..कोमजते मन कधी हिरमुसते पण नव्या उमेदेने उभे राहते पुन्हा  एकदा लढण्यासाठी..
            माणसाच्या जन्मापासून विचारांची हि लढाई ..पण विचार करतो तोच मनुष्य नां..ज्याकडे विचार नाही  त्याचे  अस्तित्व शून्य..!

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....