शुद्धलेखन साध्य...
भाषा ही नेहमीच प्रवाही असते.कालपरत्वे भाषेत विविध बदल होत असल्याने भाषेच्या लेखन पद्धतीतही बदल होणे साहजिकच आहे.पूर्वीच्या लेखनपद्धतीत व आजच्या लेखनपद्धतीत खूपच फरक असला तरी पूर्वीच्या काळात देखील शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व होते आणि आताही तितकेच महत्व आहे.
महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत.प्रत्येक बोलीभाषेचा आपला एक वेगळा ढंग आहे.या बोली भाषा मराठीच्या जरी मुख्य आधारस्तंभ असल्या तरी आपल्याला मराठीत लेखन हे प्रमाण मराठीमध्येच करावे लागते.सोशल मीडियावर असे कितीतरी लोक आहेत,जे खूप वेगवेगळ्या विषयांवर लिहीत असतात. लेखनामागची त्यांची इच्छा देखील खूप प्रामाणिक असते,पण मराठी शुद्धलेखनाचे नियम माहिती नसल्यामुळे अशा लोकांचे लेखन हे खूपदा अशुद्धतेकडे झुकलेले असते.ज्याप्रमाणे तुमची रांगोळी तुम्ही कितीही मनापासून जरी रेखाटली तरी जर त्या रांगोळीमध्ये रंग भरताना चूक होत असेल तर ती रांगोळी बेढब दिसते, याप्रमाणेच जर तुमचे मराठी लेखन अशुद्ध असेल तर तुमचे चांगले लेखनही वाचकांच्या मनात उतरत नाही.
लेखनात एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन करताना व्याकरणाचे नियम पाळण्याची आवश्यकता असते.शुध्दलेखन’हा व्याकरणाचाच एक भाग आहे.
" व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले लेखन म्हणजे शुध्दलेखन."
मराठी लेखन करताना जर आपण खालील नियम योग्यप्रकारे लक्षात ठेवले,आणि त्याचा लेखनात वापर केला तर त्याचा उपयोग तुम्हाला लेखन वाचनीय करण्यासाठी नक्कीच होईल.
१.मराठी शब्दांतील अ स्वरापूर्वीच्या शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार असतो.
उदा. खीर, पीठ, बीड,चीड,फूल, सून, गरीब, कठीण, विहीर.
तसेच शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर जर काना असेल तर पहिल्या अक्षरावर नेहमी दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार असतो.
उदा; भीमा, सीता,चीरा
उदा: गाडी,चाकू
याला काही संस्कृत भाषेतील शब्द अपवाद आहेत.
उदा: परंतु, आणि,तथापि
३.मराठीत शब्दाच्या उपान्त्य अक्षरावर नेहमीच पहिली वेलांटी आणि पहिला उकार असतो.
उदा: विली,बिडी, शिडी
४.मराठी शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा स्वर जर ए,ओ,आ असा असेल तर त्या अक्षराच्या उपांत्यपूर्व अक्षरावर नेहमी पहिली वेलांटी आणि पहिला उकार असतो.
उदा:
याला अपवाद संस्कृत भाषेतील जीवन नुपूर स्वीकार हे शब्द.
५.एका अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार असतो.
उदा: मी,तू ,ती,ही,की
६.मराठीत अनुस्वार असलेल्या शब्दात ज्या अक्षरावर अनुस्वार आहे,त्या अक्षरावर नेहमी पहिली वेलांटी आणि पहिला उकार असतो.
उदा:भिंत कुटुंब डाळिंब.
७.मराठी शब्दांमध्ये जर विसर्ग असेल तर विसर्गाच्या आधीच्या अक्षरावर नेहमी पहिली वेलांटी आणि पहिला उकार असतो.
उदा:दु:खी,नि:पक्ष
८.कवि, हरि, गुरु, वायु, प्रीति यासारखे संस्कृत शब्दांना संस्कृत भाषेत जरी शेवटच्या अक्षरावर पहिली वेलांटी असली तरी मराठी भाषेत हे शब्द लिहीत असताना नेहमी दुसरी वेलांटी लिहावी.
९. सामासिक व साधित पद्धतीने बनलेेल्या शब्दातील पहिले अक्षर संस्कृत भाषेतील शब्दासारखेच लिहावे.
उदा:कविराज, लघुकथा.बुद्धिमत्ता, बुद्धिमान१०.पहिली वेलांटी आणि पहिला उकार असलेल्या शब्दांंचे सामान्यरूप करतांना त्यांची
दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार होतो.
उदा: कवि-कवीला-कवीसाठी, गुरु-गुरूचा.
११.मराठी शब्दामधील पहिल्या अक्षरावर दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार असेेल तर त्याचे सामान्यरूप करतांना त्याचा पहिली वेलांटी आणि पहिला उकार होतो.
उदा. सून-सुनेला, चूल-चुलीपुढे, चूक-चुुकीचेे.
उदा. सून-सुनेला, चूल-चुलीपुढे, चूक-चुुकीचेे.
१२.ए स्वर असलेल्या शब्दाचे सामान्यरूप करताना त्याला ण्या जोडतात.
उदा. करणे-करण्यासाठी, पाहणे-पाहण्यास,
१३.ऊ किंवा उ अक्षर असलेल्या शब्दांंचे सामान्यरूप करताना त्याला ऊ चा व होतो
उदा. पाऊस-पावसाचे, देऊळ-देवळात,पाऊल-पावलांचे
आशा आहे की वरील लेखन आणि त्यात दिलेले नियम आपल्या लेखनासाठी साहाय्यक ठरतील.
तुमच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा 💐
धन्यवाद !!!