नात्याची मखमली शाल
💖नात्याची मखमली शाल💖 जन्माबरोबरच मनुष्य नात्यांच्या अनेक बंधनाची शिदोरी सोबत घेऊन येतो.मनुष्य, मनुष्याचे कुटंब,अनेक कुटंबांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला समाज आणि अनेक समाजांच्या सुमधुर नात्यांमधून निर्माण झालेला देश. नाते कोणतेही असो...नाते आणि झाडं यांच्यात काही गोष्टींबाबत कमालाचे साम्य असते.ज्याप्रमाणे बहर ओसरल्यानंतर झाडाला खतपाण्याची आवश्यकता असते;त्याप्रमाणे नात्यांनाही संयम,सहिष्णुता आणि आत्मियता रूपी खताची आवश्यकता असते.यासाठी एकमेकांची विचारपूस केली पाहिजे... एकमेकांची काळजी घेतली पाहिजे... एकमेकांवर नियंत्रण न ठेवताही एकमेकांच्या तणावांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे ...आपलेपणा असल्याशिवाय कोणतंही नातं बहरत नाही. नाती निर्माण करता आली पाहिजेत.. नाती फुलवता आली पाहिजेत आणि त्या बहराचा आनंदही घेता आला पाहिजे. संवेदना हा कोणत्याही नात्याचा पाया असतो.... संवदेना म्हणजे साम आणि वेदना, म्हणजे सुख आणि दु:ख मिळून तयार झालेले रूप,जे मनुष्याला आयुष्यातील ऊन सावलीच्या भावनांशी ओळख करून देत असते.संवाद ...