★दारुत झिंगलेला महाराष्ट्र★

★दारुत झिंगेलेला महाराष्ट्★

दारुच्या गुत्त्यावर देशी दारु ढोसणारे शिवसेना समर्थक आज वाईन निर्मिती तज्ञ बनलेले आहेत.या शेणकिड्यांच्या समोर जर वाईन,स्कॉच,व्होडका यांचे ग्लास ठेवले तर या मतिमंदांना यामधील वाईन कोणती,स्कॉच कोणती,व्होडका कोणती हे चटकन सांगता येणार नाही.शेणकिड्यांच्या बुडांना आज वाईन जिज्ञासा चावण्याचे कारण हे आहे की 
महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात सरकारचे असे म्हणणे आहे की महाराष्ट्रात अनेक वायनरीज असल्यामुळे किराणा सामान मिळणाऱ्या सुपर मार्केटसारख्या ठिकाणी वाईन विकण्याच्या धोरणाला परवानगी देण्यात आली आहे.
1000 चौरस फूटच्या जागेत शोकेस करून वाईन विकता येईल,शेतकर्‍यांच्या फलउत्पादनाला यामुळे चालना मिळेल.दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीत पाच कोटींची भर पडेल, असा अंदाज आहे.
सध्या राज्यात दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटल्सची विक्री होते.सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
       दारुचा गुत्ता,देशी दारुचे दुकान,ताडी विक्री केंद्र या गोष्टींशी घनिष्ठ संबंध असलेले लोक ज्या महाआघाडी सरकारमध्ये आहे,त्या महाआघाडी सरकारला दारु या विषयाबद्दल कनवळा असणे साहजिकच आहे.दुकानात दारु विक्री,रेशनच्या दुकानात दारु विक्री यानंतर कदाचित महाआघाडी सरकारची घरपोच दूध विक्री याप्रमाणे घरपोच सुलभ दारु विक्री ही योजना असेल.महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा हा प्रकार महाराष्ट्रातील जनतेने  खपवून घेता कामा नये. 
      या निर्लज्जपणे घेतलेल्या निर्णयाची शेतकरी हितासाठी घेतलेला निर्णय अशी भलावणा महाआघाडी सरकार करत आहेत.शेतकरी हीत हेच कारण असेल तर मग रम उसापासून बनते,स्कॉच जव,धान्यांपासून बनते,व्हिस्की आंबवलेल्या धान्यांपासून बनते,
ब्रॅन्डी फळांच्या आंबवलेल्या रसांपासून बनते.
व्होडका धान्य,आंबवलेल्या बटाट्यांपासून बनते.
जर वाईन विक्री शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर रम,व्हिस्की,ब्रँडी,व्होडका,स्कॉच यांना परवानगी कां नाही? वाईनलाच प्राधान्य देण्यामागे श्रीमंत बागायतदार शेतकरी गटाचा दबाव असण्याची दाट शक्यता आहे.
     2011 साली महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरणात व्यसनाचा पुरवठा दिवसेंदिवस कमी कमी करत जाण्याचे धोरण स्वीकारले आहे.असं असूनही दारूबंदी उठवणे, दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे हे आपल्याच धोरणाशी विसंगत आहे.यातून तरुण मुले अधिक व्यसनी होणार आहेत.

-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल