तिच्या खांद्यावर पहुडलेली संध्याकाळ
तिच्या खांद्यावर पहुडलेली संध्याकाळ .....अजूनही माझ्या मनात आठवणींची सांजवेळ घेऊन येते.....तिच्या पाठीवर बोटाने रेखाटलेला चंद्र अजूनही गत क्षणांचा संधीप्रकाश पसरवतो...तिच्या स्पर्शांचा प्राजक्त अजूनही दरवळतोय माझ्या श्वासात...मखमली क्षणांची पालखी अलगदपणे पुन्हा नजरेसमोरून जाते....आणि क्षितीजापलिकडे गेलेल्या भूतकाळाला पुन्हा एकदा वर्तमानाच्या दोरखंडाने खेचण्याचा असफल प्रयत्न होतो....शब्द जगले की कागदावर उतरलेले शब्दही जीवंत भासतात....आभासाचे खेळ...तरीही हवेहवेसे वाटणारे....वर्तमानाचा चटक बसूनही भूतकाळात रमवणारे....
ससेमिरा हा भावनांचा ....जणू वेस्लवर्ल्डमधील तो इलेक्ट्रॉनिक झोका.....भरधाव वेगाने खाली येणारा... आणि तितक्याच वेगानं वरती जाणारा...
एक लपाछपी... स्वतःच स्वतःशी खेळलेली...जिंकणारेही आपण आणि हारणारेही आपणच.
-मनोज राणे