अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी

★अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी★

आपण सध्या अशा महाराष्ट्रात राहतो आहे जिथे एका महिलेला सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने हरामखोर म्हणणे आक्षेपार्ह नाही,त्याच प्रवक्त्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना चुतिया म्हणणे आक्षेपार्ह नाही,पण एखाद्याने व्यंगात्मक ट्विट करणे मात्र भयंकर आक्षेपार्ह आहे.
           एका व्यंगचित्रकाराने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला व्यंगात्मक ट्विट आक्षेपार्ह वाटणे हेच सर्वात मोठे मानसिक व्यंग आहे.
राबडीदेवी हा शब्द कधीपासून आक्षेपार्ह झाला?अशिक्षित राबडीदेवींना भलेही राज्यकारभार नीट जमला नाही,तरीही राबडीदेवींनी जबाबदारीतून पळ काढला नव्हता हेही सत्य आहे.
        राबडीदेवीचा नवरा लालूप्रसाद यादव कितीही भ्रष्टाचारी असेल,भलेही तो भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेला असेल,पण लालूप्रसाद यादव नेहमीच निधड्या छातीने विधानसभा निवडणूक लढवून जनतेच्या मतदानाने निवडून आला होता.
मुख्य म्हणजे लालूप्रसाद यादवने कधीही घरातून राज्यकारभार केला नाही. 
        राबडीदेवींना भलेही राजकीय क्षेत्रात अपयश आले असले तरी राबडीदेवी या यशस्वी दुग्धव्यवसायिक आहेत. राबडीदेवींकडे ६३ गायी आणि ३७ बछडे आहेत.कष्ट करून दुग्धव्यवसाय करत राबडीदेवींंनी ६.५० कोटी रुपये कमावले आहेत.राबडीदेवींनी नव-याच्या पैशाने स्वतःच्या नावावर जमीनी खरेदी केलेल्या नाहीत. 

-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल