राष्ट्रहित

★ मी मोदींच्या सोबत....★

मोदींच्या सकाळी मनात आले... मिडीयाला ९ वाजताच्या कार्यक्रमा विषयी सांगण्यात आले... मोदी टीव्हीवर आले आणि त्यांनी शेती कायदे रद्द केले.
देश चालवणे म्हणजे काय मॅगी बनवणे आहे? असे निर्णय एका क्षणात,एका दिवसात,एका महिन्यात होत नाही.त्यासाठी प्रदीर्घ काळ विस्तृत चर्चा झालेली असते.तुम्हा आम्हाला आवडो ना आवडो भारतातील राजकीय व्यवस्था जात,शेतकरी,भावना यावर चालते.
देशात सुधारणा करण्यासाठी हाती सत्ता असली पाहिजे.शेती कायदे रद्द न करता आगामी काळात१० वर्षे सत्ता काँग्रेसकडे सोपवण्यापेक्षा शेती कायदे रद्द करणे हाच योग्य निर्णय होता हे नंतर सर्वांनाच लक्षात येईल.
      मोदींनी एखादा निर्णय मागे घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.२०१५ साली  जमीन सुधारणा कायदा मोदींनी मागे घेतला होता. तेव्हाही मोदींवर टीका झाली,पण त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती होत भाजप पुन्हा २०१९ साली सत्तेवर आला.राजकारणात परिस्थितीचा सारासार अभ्यास करुन काही वेळेला माघार घ्यावी लागते.
         ज्यांना थोडीफार राजकीय आणि व्यवहारिक समज आहे त्यांना मोदींनी  शेती कायदे रद्द करताना उच्चारलेले  वाक्य लक्षात आले असेल.

मोदी म्हणाले,

"किसानों के लिए किया था,देश के लिए वापिस ले रहा हूँ!"

टीका होईल हे माहिती असूनही मोदींनी स्वतःच्या इगोपेक्षा देशहित महत्त्वाचे मानले.
         हाती सत्ता नसली की काय वाट लागते हे आपण महाराष्ट्रात बघतोत.सोशल मिडीयावरील योद्धांना ग्राऊंडवरील समज असेलच असे नाही.तीन तलाक रद्द केले म्हणून मुस्लिम महिला भाजपला मत देणार नाही,त्या काँग्रेसलाच मत देणार.शेती कायदे कितीही चांगले असले तरी काँग्रेसने पोसलेल्या शेतकरी संघटना आंदोलन करणारच होत्या.
          आज शेती कायद्याच्या समर्थनार्थ  लिहीणाऱ्यापैंकी कितीजण शेती कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते? उत्तर नक्कीच नाही असे असेल. साधारणतः एक वर्षापूर्वीच मी  सोशल मीडियावर लिहीले होते की शेतकरी संघटनांना खाजच असेल तर मोदींनी राजकीय हाराकिरी करण्यापेक्षा सरळ शेती कायदे रद्द करावेत.
  तसेही सोशल मिडीयावरील काही हायपर हिंदूंच्या मतांकडे फारसे लक्ष देण्याची गरज इतर वेळीही नसते,तशी ती आजही नाही.ती जमात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायमच पेटलेली असते.कधी ते मोदींना मियाँ मोदी म्हणतात तर कधी संघाची हिंदूंना गरज नाही असे म्हणतात.त्यांना सतत काही ना काही खाद्य हवे असते.
   वाजपेयींच्या तत्वांच्या आग्रहाची फार मोठी किंमत देशाला,हिंदूंना चुकवावी लागली होती.
वाजपेयींच्या तत्वांच्या आग्रहामुळे २००४ साली भाजपची सत्ता तर गेलीच,पुढील काँग्रेस सरकारच्या काळात पुढील १० वर्षे हिंदू नेत्यांचा,हिंदू संघटनांचा "हिंदू दहशतवाद" या लेबलखाली अतोनात छळ झाला.

त्यामुळे यावेळेस तरी शहाणे व्हा.
गोर्बाचेव्ह हा सोव्हिएत युनियन ऑफ रशिया या देशाचा अध्यक्ष.अमेरिका प्रायोजित मिडीयाने गोर्बाचेव्हच्या आर्थिक,सामाजिक,राजकीय सुधारणांची प्रशंसा सुरु केली,त्याला नोबेल शांती पुरस्कारही दिला गेला,आणि एक दिवस सोव्हिएत युनियन ऑफ रशियाचे तुकडे झाले.

तात्पर्य:मोदींचा गोर्बाचेव्ह करु नका

-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल