अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोंग
★अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोंग★
जेएनयूमध्ये देश तोडण्याच्या घोषणा देणाऱ्यांना नक्षलवाद समर्थक विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,.मुंबईत CAA विरोधी आंदोलनात फ्री काश्मीर असा फलक झळकवणा-यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,पण कंगणा रणावत,विक्रम गोखले यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही.
भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे.कंगणाने आज केलेल्या वक्तव्यामध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही तरी काँग्रेसला कां झोबले?तशीही कंगणा विरोधात पोलीस केस जरी नोंदवली तरी न्यायालयात ती केस एक मिनिट देखील टिकणार नाही हेही तितकेच खरे आहे.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता का? मग या देशाच्या राष्ट्राचा राष्ट्रपिता कोण होता? कंगनाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही? कंगनाचे वक्तव्य बेताल,मग स्वरा भास्करचं विधान काय आहे?
कोण तो कन्हैय्याकुमार कोणालाही माहित नव्हता.जेएनयूमध्ये त्याने देशविरोधी घोषणा दिल्या तेव्हा त्याला डोक्यावर घेऊन मिडीयावाले नाचले... हिंदीतील दुय्यम दर्जाची अभिनेत्री सोशल मिडीयावरुन दंगली भडकवते,हिंदुत्वाचा अपमान करते,ती थेट माध्यमांच्या गळ्यातील ताईत होते.
"भारत तेरे टुकड़े होंगे" अशा घोषणा देणाऱ्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य बहाल करत मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले आज कंगनाच्या बोलण्यावर टीका करत आहेत.
जगातील कोणताही मनुष्य जन्माबरोबरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन येत असतो.भारतीय राज्यघटना निर्माण होण्याच्या आधीपासूनच भारतातील सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते.भारतीय राज्यघटनेतील कलम 19 नुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला भाषण,लेखन, छपाई, रेखाचित्र किंवा इतर कोणत्याही प्रकारे, आपले मत आणि विश्वास मुक्तपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे .
यावर कोणी ही बंदी घालू शकत नाही किंवा तुमचा मूलभूत अधिकार कोणी रोखत असेल,बाधा आणत असेल किंवा तुम्हाला मानसिक त्रास देत असेल, किंवा तुम्हाला तुमचा मत मांडू देत नसतील तर, तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करू शकता.भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये असे म्हटले आहे की "कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही".या व्यतिरिक्त तुम्हाला बोलण्यापासून किंवा लिहिण्यापासून तुमचं मत मांडण्या पासून कोणी रोखू शकत नाहीत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सोयीस्कर पद्धतीने डफली वाजवणारे भारतातील पत्रकार, लिबरल लोक, पुरोगामी मंडळी यांची लाडकी कन्हैयाकुमार अँड कंपनी महाराष्ट्र मध्ये येऊन एल्गार परिषद घेऊ शकते,भीमा कोरेगाव दंगल घडवते,मग गोखलेंना अधिकार नाही कां त्याचे विचार मांडायचे? उमर खलीद सारख्या देशद्रोह्याचे उदोउदो करणारे करणारे कंगना आणि विक्रम गोखलेंवर वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करता.किती पोकळ आहे रे पुरोगामी मंडळींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
जोपर्यंत तुम्ही पुरोगामी लोकांच्या विचारांना अभिप्रेत वागाल तोपर्यंतच तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित! कोणी वेगळा विचार मांडला की त्याचे पुरस्कार काढून घ्या, त्याला जेलमध्ये टाका, त्याच्याकडून माफी मागवा ही पुरोगामी लोकांची नाटके देशात सुरु होतात.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त काय हिंदुत्वविरोधी औलादींनाच कां? की सध्या दिवाळीच्या सुट्टीवर गेले आहे पुरोगामी मंडळींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ...सौ करोड विरूद्ध पंधरा करोड ही भाषा वापरायला तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? जे लोक ड्रगीस्ट आर्यन खानची तळी उचलतात आणि बॉम्ब स्फोटातील देशद्रोह्यांचे ज्यांच्याशी व्यावसायिक संबध आहे, त्यांना पद्मश्री कंगनाला बोलायचा अधिकारच नाही