साहेबप्रेमी -एक चित्रविचित्र जमात

★ साहेबप्रेमी -एक चित्रविचित्र जमात ★

जगात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडून येतील, 
मुंबईत बर्फ पडू शकतो ....दक्षिण भारतात हिमालय पर्वताच्या रांगा निर्माण होतील ...पुणेकर बाहेरून पुण्यात आलेल्या  लोकांशी सौजन्याने बोलतील...देशातील भ्रष्टाचार नाहीसा होईल...एवढचं कशाला अगदी शिवसेनेचे बिनडोक समर्थक देखील समंजसपणे वागायला सुरुवात करतील...अगदी सांगायचं झालं तर आपल्या देशातील आजच्या सर्व प्रमुख समस्या या समाप्त झालेल्या असतील.... या सर्व गोष्टी घडून येतीलही,पण जगातील एक गोष्ट आहे, जी आकाशातील सूर्य,चंद्र आणि तारे यांसारखी अढळ आहे...जी कधीही नाहीसी होणार नाही. ती गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साहेबप्रेमी लोकांचा बिनडोकपणा ...आणि साहेबप्रेमींच्या डोक्यात भिनलेला किंबहुना भिनवला गेलेला जातीयवाद .
      यामागचे प्रमुख कारण हे आहे की या लोकांच्या नसानसात जातीयवाद भिनलेला  आहे...पश्चिम महाराष्ट्रातील साहेबांच्या पक्षाने हा जातीयवाद पोसण्यासाठी जाणिवपूर्वक  प्रयत्न केले आहेत...
या लोकांना वास्तव मान्य करायचे नसते.यांच्या साहेबांची राजकीय ताकद पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्या पलीकडे नाही,हे सत्य हे लोक कधीही मान्य करत नाही.साहेबांच्या पक्षाचे कधीही १० पेक्षा खासदार निवडून येऊ शकले नाही तरी हे साहेबप्रेमी वर्षानुवर्ष याच भ्रमात जगत आहेत की यांचे साहेब एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील.आता तुम्ही लोक असा प्रश्न उपस्थित करणार की जर या साहेबप्रेमी लोकांच्या साहेबांची ताकद इतकी तोकडी आहे तर हे साहेबप्रेमी असे कां वागतात? तर त्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की पश्चिम महाराष्ट्रातील या साहेब प्रेमींसाठी भारत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ..पश्चिम महाराष्ट्र  पलीकडे या लोकांना जग दिसत नाही.ते त्यांच्या  साहेबांनी भाषणांमधून सांगितलेल्या गोष्टींमधून साहेबांची असलेल्या नसलेल्या  राजकीय ताकदीची कल्पना करत स्वतःच्या मनात मनोराज्य निर्माण करत असतात.
 आपण जर सोशल मीडियावरील या साहेबप्रेमी मंडळींनी लिहीलेल्या पोस्ट वाचल्या तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की या साहेबप्रेमी लोकांची मानसिक अवस्था अत्यंत दयनीय आहे.याच गोष्टीचा फायदा इतकी वर्ष यांच्या साहेबांनी घेतलेला आहे.
ह्या लोकांची अशी मानसिक अवस्था का झाली आहे याबाबत विचारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.

Popular posts from this blog

I love Pune Traffic....

सुखाची ओंजळ

पुरोगामी मुळव्याध