खुजी मानसिकता
★खुजी मानसिकता★
मध्ययुगीन भारतात जेमतेम काही हजारात असलेल्या मुघलांनी भारतावर आक्रमण केले होते.तरीही त्यांनी हिंदूंवर राज्य केले ते धर्मांतर केलेल्या हिंदूंच्या मदतीने.हिंदू राजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तो स्वतःची कातडी,संपत्ती वाचवण्यासाठी.शिवाजीराजेंना स्वकीयांशीच लढाया लढाव्या लागल्या.
भारतावर दिडशे वर्षे राज्य करण्यासाठी किती ब्रिटिश भारतात राहिले होते,तर जेमतेम दहा हजारच्या आसपास ब्रिटिश भारतात होते.मग दीडशे वर्षे राज्य करताना भारतातील बत्तीस कोटी लोकांवर अत्याचार कोणी केले तर ब्रिटिशांच्या सोबतीने ब्रिटिशांच्या हाताखाली असलेल्या लाचार भारतीयांनी.जालियनवाला हत्याकांडात १३०० निरपराध लोकांना गोळ्या घालून कोणी ठार केले? ब्रिटिश सेना तर तेथे नव्हती, बहुतांशी सैनिक भारतीयच होते,कारण मानसिकता गुलामगिरीची.ब्रिटिशांची सत्ता हाँगकाँगमध्येही होती, पण तेथील स्थानिक लोक ब्रिटिश सैन्यात भरती झाला नाही.देशप्रेम याला म्हणतात.
स्वार्थीपणा,कपटीपणा,देशद्रोहीपणा, गद्दारपणा,विश्वासघात हा भारतीय मानसिकतेत रुजला आहे.काही लोक स्वार्थासाठी स्वतःलाच काय देशालाही विकायला तयार असतात.देशहित विसरून मी,माझे कुटुंब,माझा आवडता राजकीय पक्ष,आवडता राजकीय नेता प्रथम मानून जगतात,मग हिंदू धर्म,राष्ट्रहिताचे नुकसान कां होवो.
-मनोज राणे