अरे संसार संसार.....

लग्ना नंतर सुख-शांती 
कधी ना मिळाली 
बायकोच राज्य करी   
ह्या घरात माझ्या ....!

बायकोने तोंड चालवावे 
पोरांनी भोकाड पसरावे 
शिव्यांचा नित्य खुराक 
ह्या घरात माझ्या ....!

उधारी आणि देणेकरी 
त्यातुनी सतत सासूचा घरात राबता 
छळावया कमी नाही 
ह्या घरात माझ्या ....!

अनेकदा मागूनही मला 
चहा देखील न मिळाला 
मालक असून घरात भिकारी 
ह्या घरात माझ्या ....!

भिजलेले पोरांचे बिछाने 
रोज मीच उचले 
तरी मी कुचकामी 
ह्या घरात माझ्या ....!

सांगावा कोणा  हा तमाशा 
सासू-सासरे ही माझ्यावरच रागवे 
बळीचा बोकड बनलो 
ह्या घरात माझ्या ....!

पाहुनिया दुख माझे
शेजारी आसवे सांडे 
बायको मुलांमध्ये हरवलो 
ह्या घरात माझ्या ....!


(विशेष  सूचना : कविता काल्पनिक  आहे )


Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....