प्रतिक्षण मनाचा नवजन्म....

प्रतिक्षण नवा जन्म येथे 
माझी चौफेर मनाचा 
कांं उभारावे भूतकाळतील 
अपयशाचे तांड 
भविष्याच्या सोनेरी वाटेवर,
फेकून देतो ओझे मी 
गतकाळात घडलेल्या गोष्टींचे,
नाही शिवत कधी बोच 
मनाला दु:खाच्या किनारेची 
जेव्हा  जाणीव मला तिच्या 
अस्तीवाच्या क्षणभुंगरतेची,
 कांं वागावे मी 
कोणाच्या मर्जीखातर 
वाटे अपराधी जर दाटे 
मनी माझ्या कातर ,
लोटले मी सहानभूती वर जगणे 
वाटले परके माझ्याशी 
माझेच जीवन गाणे ,
आहे माझ्याकडे आयुष्याची आकडेमोड 
भूतकाळाची वजाबाकी 
आणि भविष्याची बेरीज 
हिशोब सुखाचा मी वेगळा रचतो, 
परवा नसे कधी लोकांची मजला, 
वादळावर स्वार  अश्व  माझे 
सकारात्मकतेचा सूर्य जपला मी साद उशाला

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....