मराठी मातृभाषा आमची

मराठी मातृभाषा आमची 
उत्कर्ष घडे सदैव तिचा 
अभिमान तिचा आम्हा 
महाराष्ट्र धर्म थोर आमचा 

वाणी ही संतांची 
लाडक्या तुकोबा आणि रामदासाची 
कीर्ती वदली  देशभर 
शौर्याची भाषा शिवबाची 

साहित्य देणगी अपार 
अखंड उधळण विद्वेतीची 
कथा कादंबरी कविता 
सांगतात थोरवी श्रेष्ठ बुद्धिमत्तेची 

परभाषा इथे असह्य 
निर्म्या शब्द इंग्लिश भाषेशी 
मराठीने दिले  शब्द 
नाते जपले नेहमीच  कला गुणांशी 

मायबोली आमची मराठी 
निश्चयाचा महामेरू  जिने गौरविला 
करू शर्थ दिव्य पराक्रमाची 
उडे जरी चौफेर सूर्य ज्वाला 

.

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....