थेंबांची रांगोळी

पाउस भेटून गेल्यावर
वसुंधरेवरती हिरवाईची मंदियाळी 
लाजेने भिजलेल्या पानांवर 
ओल्या थेंबांची रांगोळी 

चिंब भिजूनी 
पाण्यासवे धावणारे रस्ते
दूर हटली काह्याली
प्रसन्नेची नवी कांती लेवून
सजलेल्या बिल्डिंग देखण्या
डोकावतात आरश्यात उन्हाळी

पाऊस बरसून गेल्यावर
शिळ घाले हिरवी डहाळी
पांघरूण साज लावण्य नवे
अवनी हर्षित अवघी भूपाळी

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....