मुखवटे

श्रीमंतासाठी खोटे हसू 
गरिबांसाठी बनावटी  आसु 
जसा असेल माणुस 
सोंग  आम्ही तसे फासु

सगळीकडेच दिसतात मुखवटे 
आतून खरे बाहेरून खोटे 
खरा माणुस  आता 
 फक्त  पुस्तकामध्येच भेटे

कोणते पाप आणि कुठले पुण्य
मैत्रीतही फसवणुकीचे साटेलोटे 
प्रामाणिकता वगैरे  शब्दा आडहि
आजकाल लपतात मुखवटे

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....