वाहत जाणारी रहदारी

गर्दीचा महापूर 
सतत धावणारे निर्जीव  चेहरे 
रोज वाहत जाणारी रहदारी 
आणि अपेक्षांनी वाकलेली शरीरे 
रोज दिसतात 
जीव मोजून लोकल ला लटकलेली 
दगडी मनाची माणसे 
भाव-भावना दूर कुठेतरी फेकलेली 
  
धावतात सैरवैर 
यशाचा आसरा घेण्यासाठी 
थिजलेल्या यशाचे 
हरवलेले घर मर्यादेत गाठण्यासाठी 

काय मिळवले काय हरवले 
नसे सोयरसुतक कुठल्याच जीवाला 
सुख आणि दुख 
दोन्ही गोष्टींचे माप एकाच बाजूला

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....