ब्रेकअप.....

खरतर ताटातूट 
ही काही एकदम होत नाही 
आधी मनात, मग वागण्यात 
अशी सुरुवात होते 
आणि शेवटी ताटातूट कृतीत उतरते .....

ताटातूट ला सुरुवात असते 
पण अंत नसतो 
कारण जरी ताटातूट 
झालेली असली तरी 
दूर झालेल्या जिवलग व्यक्तीला 
आपण भेटतच असतो 
आपल्या मनात,आठवणीत 
विचारात ,जाणिवात 
रोज कितीतरी वेळा 
आपली त्या व्यक्तीशी 
भेट होतच  असते ...
 
बळ  असो व नसो 
ताटातूट ही सहन करावीच लागते 
हे कितीही सत्य असले तरी 
तरी ताटातूटीची  वेळ 
कुणावरही येवू नये 
ईश्वर दोन जीवाना 
एकत्र आणतो 
हे जर खरे असेल तर 
ईश्वर त्या दोन जीवांना 
वेगळे तरी का करतो 
 

...खरतर ताटातूट 
ही काही एकदम होत नाही 
आधी मनात, मग वागण्यात 
अशी सुरुवात होते 
आणि शेवटी ताटातूट कृतीत उतरते .....

ताटातूट ला सुरुवात असते 
पण अंत नसतो 
कारण जरी ताटातूट 
झालेली असली तरी 
दूर झालेल्या जिवलग व्यक्तीला 
आपण भेटतच असतो 
आपल्या मनात,आठवणीत 
विचारात ,जाणिवात 
रोज कितीतरी वेळा 
आपली त्या व्यक्तीशी 
भेट होतच  असते ...
 
बळ  असो व नसो 
ताटातूट ही सहन करावीच लागते 
हे कितीही सत्य असले तरी 
तरी ताटातूटीची  वेळ 
कुणावरही येवू नये 
ईश्वर दोन जीवाना 
एकत्र आणतो 
हे जर खरे असेल तर 
ईश्वर त्या दोन जीवांना 
वेगळे तरी का करतो 
 

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल