नार ती गुलजार

आली पाहुणी कोणाकडची
रूप तिचं सकवार 
थुमकत तिची चाल 
पांघरून यौवन भरदार 

डोळे तिचे मासळीवाणी
लावती जीवास सर्वांच्या घोर 
भरल्या पिकास लाजवेल 
जवानी तिची अशी शिरजोर 

लालजर्द ओठ जणू 
रसाळ डाळिंब फोडी 
काळीज कापीत जाते
नजरेतील तिच्या लाडीगोडी 

चोळी सोसे अबोलतेने
यौवनाचा अधिभार तनू
काया संगमरवरी शिल्प
कंबर नदीचे वळण जणू

नार ती गुलजार 
अंगावर तिच्या सोन्याची जरतार
सैल अंबाडा,पायी पैंजण 
नखरेल नारचा नखरेल शिनगार

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....