शब्दांचे सोहळे

थोडे काही बोलण्यासाठी 
मी सजवतो शब्दांचे सोहळे 
पण मूक राहूनही 
खूप काही बोलतात 
तुझे डोळे 

नजरेतून बोलतेस तु 
पापण्यामधून लज्जेचे तराने 
असे तुझे खेळ 
जगास करीती दिवाने

एक ती खळी गालाची
दुसरी तुझी ती केसांची बट
नजर फितूर जीवघेणी
शरणागत होई तृष्णा अनवट

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....