अर्थ जीवनाचा

शोधू नको माझ्या मना 
येथे  अर्थ जीवनाचा 
अनामिक क्षणी होई 
येथे सारीपाट जीवनाचा 


असते येथे निराशा 
आशेत गुंफलेली 
स्वप्ने सजून येतात 
वैफल्य माळलेली


हास्यात जयघोष आसवांचे 
बहरतील कळीला 
भय  निर्माल्य  होण्याचे 


कधी हर्ष तर कधी काहूर 
नाना  तरंग मनी उडे 
श्वास उगवे तरी  रोज नव्याने 
खेळ नियतीचा नित्य घडे


Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....