पॉर्न आणि सेक्स

★पॉर्न आणि सेक्स★

पॉर्न ह्या गोष्टीवर बोलायला,एकंदर सेक्स या विषयावर बोलायला बरेचसे लोक टाळतात, दुर्लक्ष करतात,लाजे खातर टाळतात,पण जर उद्याचे चांगले नागरिक घडवायचे असतील तर सेक्स या विषयावर बोलणे,चर्चा करणे खूप महत्वाचे आहे,आवश्यक देखील आहे.
पॉर्नची गरजच काय,पॉर्नवर संपूर्ण बंदी असावी असे मानणारेही लोक आहेत आणि पॉर्न हे सर्व वय,भाषा आणि धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणि फुकट असावे असे मानणारा गट ही आहे.सेक्स हा विषय तसा भारतात गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते.याची सुरुवात मग  पॉर्न बघण्यापासून होते.
    प्रेमातून सेक्सकडे जाता आले पाहिजे,पण लोक सेक्सकडून प्रेमाकडे येण्यासाठी धडपडतात,यासाठी पॉर्न मुव्हिज या फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत.
प्रत्येकाच्या वयानुसार आवडीनिवडी,शारिरीक आणि मानसिक बदल घडतच असतात कायम. सृष्टीचे चक्र असं सतत फिरत असतं.ह्या बदलांसोबत सेक्स विषयी कुतूहल वाटणेही साहजिक आहे.जगात एकही स्त्री पुरुष नसेल की ज्याने असली उत्तेजनात्मक, nude फोटो अथवा सिनेमा बघितल्यावर ज्यांच्या लैंगिक भावना जागृत होत नाही.स्त्री पुरुष यांच्या  शरीरसंबंधबद्दल आकर्षण वाटणे हे साहजिक आहे,पण त्या आकर्षणाचे वासनेत रूपांतर होऊन कोणाला त्याचा त्रास होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकाची असते.वाढत्या वयानुसार संप्रेरकचे प्रमाण एवढे वाढत जाते की या मोजक गोष्टींशिवाय आयुष्य पचवणेच अजीर्ण होऊन बसते.जन्म घेतलेला प्रत्येक जण सभ्यता आणि अश्लीलतेच्या गुणांना स्पर्श करतोच,मात्र काहीजणांसाठी तो स्पर्श स्वतःच्या श्वासापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचा वाटू लागतो,ज्याने स्वआनंद आणि बाह्यानंद यातील विभाजनाची रेखा वाढतच जाते.
   इतर मुलांची सेक्स या विषयातील so called प्रगती ऐकून आपल्याही डोक्यात तो वासनांचा राक्षस थैमान घालू लागतो,भुकेने व्याकुळ होऊ लागतो नी मग वाटतं, अरे! त्याच तर पहिलं kiss ही मिळालं, त्याचं तर सगळं आटोपलं.. मग आपण का अजून मागे? त्यातून निर्माण होते स्पर्धेची भावना.. पण खरंच सेक्स हा विषय स्पर्धा करण्यासारखा आहे का? आणि हे सगळे मित्रांनी सांगितलेले किस्से हे खरंच घडले आहेत की तिखटमीठ लावून अतिरंजित करून स्वतःच पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी रचले गेलेले आहेत हे कसे ठरवायचे.सहसा ह्या असल्या कथा भंपकच असतात,समजा जरी ते किस्से एखाद्या वेळी खरंच घडलेही असतील,तरी ते किस्से मित्रांसोबत एखाद्या अश्लील सिनेमासारखे प्रस्तुत करणे,हा एक खूप मोठा नैतिक अपराध आहे.
   सहवासाचे क्षण हे सदैव लक्षात राहतात आणि म्हणूनच त्यात मनुष्य ज्या व्यक्तीकडे physically आणि emotionally attracted असतो, त्या व्यक्तीबद्दल त्या आठवणी असतात. म्हणून फक्त मित्रांमध्ये hero बनण्यासाठी किंवा मी बघा कसा मर्द आहे, हे दाखविण्यासाठी पॉर्न फिल्म्सचे व्यसन लावून घेणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक केल्या सारखे आहे.porn films मधल्या लोकांचे शरीरे फक्त तिथे असतात,हृदय नाही.ती लोक एखाद्या वस्तूप्रमाणे ते काम करत असतात.porn movies मध्ये ते हे सगळं एखाद्या विशिष्ट angle ने capture करून तरुण पिढीला विकण्यासाठी तयार करत असतात. त्यामुळे त्यातून लैंगिक शिक्षण मिळतंय असं मुळीच समजू नये. उलट ते त्यातून लोक misguide जास्त प्रमाणात होत असतात.
   पॉर्न बघत असतांना मनुष्याच्या शरीरात वेगवेगळी रसायने तयार होत असतात,जसे dopamine, norepinephrine, testosterone, oxytocin, आणखीही बरेच काही,पण या बरोबरच सेक्स करताना emotional connection देखील तयार होते हे कदापी विसरून चालणार नाही.. पॉर्न बघून हे emotional connection तयार होतं नाही, मग आणखी एक porn movie मग दुसरी.. मग तिसरी....असं करतं मग पॉर्नच्या आहारी तरुणपिढी जाते.
    एखाद्या मुलीच्या सौंदर्याची स्तुती करणं, तिच्या शरीरबद्दल आकर्षण वाटणं हे सगळं ठीक आहे पण तिला खालपासून वरपर्यंत न्याहाळण, तिच्या शरीरावर comments pass करणं, शिट्या मारणं, अश्लील गाणी म्हणणं, संभाषणाच्या वेळी तिच्या डोळ्यांत किंवा चेहऱ्याकडे न बघता तिच्या शरीराच्या भागांवर लक्ष्य केंद्रीत करणं, ह्याला विकृती म्हणतात,आणि ही विकृती निर्माण होण्यास पॉर्न फिल्म्स फार मोठ्या प्रमाणावर हातभार लावत असतात.
     जेव्हा आपण प्रेमाच्या नात्यात असतो की जिथे प्रेम आहे,समजूतदारपणा आहे,विश्वास आहे त्या व्यक्तीसोबतच खरं तर आपल्याला हे स्पर्शाचे क्षण सुखद वाटतात. Sex करणे वाईट नाहीच,उलट सेक्स मीलनातून नाते आणखी घट्ट बंधनाने बांधले जाते, म्हणून ज्या व्यक्तीशी आपण सेक्स करतो ती special हवी. आणखी एक महत्वाचा भाग हे सगळं करण्याच एक योग्य वय असतं सोबतच sex जबाबदारीने करायची गोष्ट असते.इंजिनिअरिंगच्या भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात, चावी दिली की पेट्रोल इंजिन चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डिझेल इंजिनसारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही,पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला की मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.थोडक्यात काय तर स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो,ही माहिती असणे यासाठी आवश्यक आहे की मुलींना बहुतांश वेळा माहिती असते सेक्स विषयी.बहुतांश मुले याबाबतीत अज्ञानी असतात.मुले ते पॉर्न बघून विचित्र कल्पना रंगवत बसतात.पॉर्नसारखे जमले नाही की मनात न्यूनगंड बाळगतात,पण त्यांना हे लक्षात येत नाही की शेवटी पॉर्न ही मुव्ही असते.तेथे शूटिंग असते.चुकले तर रिटेक होतात.हे आपण लक्षात घेऊन चालणे आवश्यक आहे.
हा विषय फार गहन आहे आणि बरेच मुद्दे यात राहून गेले असतीलही, पण या विषयावर साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे.

-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल