मिठी

★मिठी ★

भावनांच्या आकाशाखाली मनाच्या कठड्यावर बसून तुझ्या चेहऱ्यावर नजरेच्या स्पर्शाने हळुवारतेची रांगोळी काढावी....लज्जेच्या भाराने झुकलेल्या पापण्यांची हालचाल टिपावी.....तुझ्या गालांचे बदलत जाणारे रंग निखरावे....थरथरत्या तुझ्या हातांच्या हुरहुरतेला माझ्या हातांचा आधार द्यावा..हातांच्या स्पर्शाने तुझ्या डोळ्यात चमकलेले काहुरतेचे चांदणे...पहाटेच्या दवबिंदूंच्या सानिध्यात हळूच उघडणाऱ्या  कळ्यांप्रमाणे,हळूच एकमेकांपासून अलग होणारे तुझे डाळिंब ओठ....अर्धा चेहरा ताब्यात घेतलेल्या केसांच्या आच्छादनाखाली लपाछपी खेळणाऱ्या तुझ्या कपाळाच्या क्षितिजावर अलगद उमटावे मी माझ्या ओठांचे इंद्रधनुष्य... तू नकाराची कडी दाराला लावण्यापूर्वीच मी माझ्या हातांचा दरवाजा उघडावा अन् तुला खेचून घ्यावे मनाच्या परिघात ! मग माझ्या हातांचा दरवाजा मी खट्याळतेने बंद करावा.

- मनोज राणे

Popular posts from this blog

नात्याची मखमली शाल

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....