मुंबईतील आभासी हिवाळा

★मुंबईतील आभासी हिवाळा★

उकाडा कम थंडी सदृश हवामान
म्हणजे मुंबईतील हिवाळा.
एसीच्या Temperature मध्ये नाममात्र बदल करणे,पंखा ४ वरून ३ वर आणणे
या पलीकडे मुंबईत हिवाळा ऋतू नसतो. चुकून कधी तापमान १६℃ वर गेले तर कपाटात धूळ खात पडलेले स्वेटर, कानटोपी यांसारखे मुंबईकरांसाठी अनोळखी असलेले कपडे बाहेर पडतात.मुंबईकरांसाठी गोरेगाव मुंबईतील काश्मीर तर कुलाबा सिमला..
मुंबईतील कायमस्वरूपी मुक्कामी ऋतू म्हणजे उकाडा.
पावसाळा हा जावयासारखा जूनमध्ये  पाहुणा येऊन जावयाची जात दाखवत यथेच्छ पाहुणचार झोडतो.जाताना चिखल,रोगराई, गटारांची त़ुंबातुंबी यासारखी उधारी करुन जातो.
 मुंबईतील हवामान हे १६  वर्षांच्या अल्लड तरुणीसारखे नाही... जिचा मूड सतत स्विंग असतो...तसे हवामान सतत स्विंग होत राहते....तसे अल्लड हवामान सिमला वगैरे शहरात. मुंबईतील हवामान निगरगट्ट बायकोसारखे असते.तीन पोरांनंतर नवरा कोठेही जाणार नाही,कोणतीही तरुणी त्याला भाव देणार नाही हे माहिती असल्याने ती बायको जशी घरावर हुकूमत चालवते.तसा मुंबईतील उकाडा हा मुंबईतील लोकांवर हुकूमत चालवत असतो.
 
-मनोज राणे

Popular posts from this blog

सुखाची ओंजळ

I love Pune Traffic....

नात्याची मखमली शाल