ती
" ती "
तिच्या छातीचे आकारमान
कमरचे वळण
नजरेने न मोजताही
तिच्यावर प्रेम करता येते,
तिच्यातील बाईपणा पलीकडेही
तिचे अस्तित्व आहे..
हे तिला स्पर्श न करताही
मनुष्याला ओळखता येते,
प्रेम भावनांना जपत
सुस्वभावी शब्दांनी
तिच्यावर ओरखडा न आणताही
तिच्या मनावर हुकूमत गाजवता येते,
हे ज्याला उमगले तो पुरुष
त्याला पुरुषार्थ पूर्णतः कळाला
आरेरावी न करताही
कोणत्याही स्त्रीचे मन जिंकता येते
-मनोज राणे