वेश्या
★ वेश्या ★
कोणी तरी सनी लिओनीला वेश्या म्हणाले...किती सहजपणे आपण वेश्या हा शब्द वापरतो...वेश्येची मजबूरी असते...वेश्या पोटासाठी ते सगळे करत असते.सनी लिओनीने तिचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी पोर्नोग्राफी स्विकारली.... तुलना होऊच शकत नाही...
दहा मिनिटे उभे राहून दाखवा एखाद्या वेश्येच्या खोलीत...लिहून देतो बहुतांश लोक नाही उभे राहू शकणार...आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वेश्या वस्तीवर एक प्रोजेक्ट केला होता.अनेक वेश्यांच्या त्यांच्या घरी जाऊन आम्ही मुलाखती घेतलेल्या होत्या.
रेड एरियातील स्त्रीयांचे ते पूर्णपणे भावनाहीन चेहरे अंगावर काटा आणतात....आश्चर्य म्हणजे त्या त्यांच्या स्टोरीज सांगताना एकदाही रडत नाही.सगळे पाणी थिजलेले.
वेश्या आणि कॉल गर्ल यात खूप मोठा फरक आहे.सर्व काही असताना काही मुली ,महिला भरपूर पैसे मिळतात केवळ या कारणासाठी'कॉल गर्ल' बनतात.वेश्या हा शब्द अशा महिलांविषयी असतो ज्यांना जन्मजात हा 'धंदा' मिळाला आहे किंवा शिक्षण आणि कौशल्य नसल्याने या प्रकारे पैसे कमवावे लागतात.अशा महिला ज्यांना न कळत्या वयात त्यांच्या घरातल्या कोणीतरी विकलेलं असत .या गावातून त्या गावात प्रवास करत करत त्या कोठे पोहोचतात तेच त्यांना कळत नाही.
स्त्री ही वापरण्यासाठीच असते... या विचारातून आलेल्या पुरुषांना खरच बाई कशी दिसते किंवा कशी राहते या गोष्टींनी काही फरक पडत नाही.त्यांना फक्त स्त्री पाहिजे असते.माणसाचे सर्वाधिक विकृत स्वरुप तुम्हाला रेड एरियात पाहायला मिळते...माणसाला जनावर कां म्हणू नये हा प्रश्न तेव्हा पडतो.
वेश्या आहेत ना... म्हणून आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत'...शहरांमध्ये रेड लाईट एरिया नसते तर शहरातील वासनाधारी लिंगपिसाट तुमच्या आमच्या घरात शिरले असते.प्रत्येक शहरातील रेड एरिया हा त्या शहरातील सर्वात मोठा डंपिंग ग्राऊंड असतो....जेथे वासनाधारी लोकांच्या वासनांची विल्हेवाट लावली जात असते.
असे वासनाधारी लोक फक्त रेड लाईट एरियात दिसतात कां..तर अजिबात नाही...सोशल मिडीया असो वा लोकल ट्रेन...किंवा बाजारातील गर्दी... Potential Rapist पावलापावलावर दिसतील.सगळे वखवखले संधीच्या शोधात.हरामखोर लोकांना माहिती नसते की आपल्या घरातील बायकांना देखील गर्दीत जावे लागते.
वेश्या या शब्दाने लोकांना किळस येते...तिथे त्यांचे अस्तित्व कोण मान्य करणार ,त्यांचे अधिकार, हक्क हे शब्द कुठे पर्यंत पोहोचणार..समाजात अस्तित्व नाही,कागदोपत्री काही भाव नाही. आधार कार्ड नाही, मतदान कार्ड नाही, सरकारच्या योजना नाही, रेशन कार्ड नाही.कधीही पोलिसांनी 'रेड'टाकायची ...पोलिस ठाण्यात उचलून न्यायचं... जास्तच झालं तर कोर्टात हजर करायचं किंवा.. मग मिळेल ते आपल्या खिशात घालून सोडून द्यायचं अस चाललेलं असते.
काही मुद्वे असे आहेत की ज्यांचा विचार करणं आवश्यक आहे.वयाच्या ४० वर्षा नंतर यांचा व्यवसाय राहत नाही, म्हणून मग यातल्या काहीजणी आपल्या हाताखाली मुली ठेवून उदरनिर्वाह करतात.अशाने ही साखळी चालूच राहते.यासाठी त्यांना योग्य ती माहिती देणे.. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रबोधन केले पाहिजे.त्या सर्वाना एकत्र आणून सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे
माणूस म्हणून जर मान्यता मिळाली तर त्या देखील इतर व्यवसाय किंवा नोकरी करू शकतील .समाजाने दृष्टिकोन बदलला तर समाजात सन्मान मिळेल आणि सन्मान मिळाला तर कुठलाही माणूस वाईट कृत्य करण्यासाठी पटकन धजावणार नाही.
वेश्या या विषयाची गांभीर्यता फारच तीव्र आहे,कारण समाज या गोष्टी समजून घेणं तर दूरच,पण कुणाच्या तोंडून ऐकायला जरी लागला ना तरी त्या व्यक्तीला नावं ठेवतो. फार महत्त्वाचं सांगायच म्हटलं तर आपल्या समाजाला *तन आणि मन या गोष्टी वेगळ्या आहेत* हे लक्षात येतच नाही. तनाचा उपयोग फक्त बाह्यतःच असतो. पण आपण बघितलं तर लक्षात येतं की , सर्व दृष्टीने आपण बाह्यांग गोष्टींनाच महत्व देतो.
स्त्रीमनाची केली गेलेली विटंबना किंवा तिच्यावर झालेल्या अन्यायाकडे फार तर लाखातला एखादाच संवेदनशील दृष्टीने पाहतो
आपण एखाद्या वेश्येला जरी काहीच देऊ शकत नसलो तरी किमान मानसिक आधार तर नक्कीच देऊ शकतो.माणूस म्हणून वेश्यांना समजून घेण्याची गरज आहे.
मुळात लैंगिकतेला हीन लेखून जेथे पाप वा घाणेरडी गोष्ट समजून दमन केले जाते तेथे अनैतिक संबंध, बलात्कार, वेश्याव्यवसाय वाढतो. घरंदाज स्त्रीया जेव्हा संभोग आनंद मिळवण्याऐवजी कर्तव्य म्हणून निरसपणे करतात तेव्हा गरिबांच्या मुलींना श्रीमंतांच्या सुखासाठी वेश्याव्यवसायात आणले जाते.
ही एक बाजू आहे जी विचारात घेतली पाहिजे. संभोगाला हीन लेखणं वा त्याबद्दल अनभिज्ञ असणारी स्त्री म्हणजे घरंदाज व त्याबद्दल ज्ञान असणारी स्त्री म्हणजे चारित्र्यहिन असल्या जुनाट, चुकीच्या व टाकावू संकल्पना सोडल्या पाहिजेत.