Posts

वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट.

 वेदनांच्या राखेतून उगवणाऱ्या परिवर्तनाची पहाट... देशाच्या सामाजिक समस्यांवर चिंतन सभ्यतेच्या भव्य महालावर प्रगतीचे सुवर्णकळस झळकत असले,विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली असली आणि तंत्रज्ञानाने जगाला एका स्पर्शाच्या अंतरावर आणले असले, तरी समाजजीवनाच्या अंतःकरणात असंख्य वेदनांचे व्रण आजही ठसठशीतपणे जिवंत आहेत. बाह्य वैभवाच्या चकाकीने अंतःकरणातील अंधार नाहीसा होत नाही; उलट तो अधिक गडद होत जातो. राष्ट्राच्या भवितव्याला पोखरणाऱ्या सामाजिक समस्या या वाळवीप्रमाणे शांतपणे आपल्या संस्कृतीच्या पायाभरणीला कुरतडत आहेत.  भाकरीच्या शोधात भटकणारा हात जेव्हा पुस्तकाऐवजी विटा उचलतो, तेव्हा भविष्याच्या कपाळावर दुर्दैवाची काळी रेष उमटते. एका बाजूला ऐश्वर्याच्या झगमगाटात न्हालेली गगनचुंबी इमारती आकाशाशी स्पर्धा करतात, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टीतील मिणमिणत्या दिव्याजवळ आयुष्याचा संघर्ष अश्रूंनी उजळत असतो. ही दरी केवळ आर्थिक नसून मानवी संवेदनांच्या अपयशाची साक्ष आहे.        जातीयता आणि धार्मिक विद्वेष हे समाजाच्या अंगणात उगवलेले भेदाभेदांचे जंगल आहे. माणसाला माणूस म्हणून पाहण्याऐव...

तिचं गोड हसणं....

Image
 

आनंदी क्षण.....

Image
 

हिंदुत्व

Image
 

स्वप्न आणि झोप

Image
 

गरज

Image
 

चलो लडकी पटाये

Image
 

नाते...

Image
 

विचार मनोजचे

Image
 

I love Pune Traffic....

Image
Welcome to the traffic extravaganza of Pune, where chaos meets creativity, and patience is an endangered virtue.In this bustling city, the roads are like mazes designed to test your driving skills and your ability to navigate through a sea of honking horns. Here, traffic signals are mere suggestions, like a gentle nudge in the right direction.Who needs those pesky red, yellow, and green lights when you can rely on the intuitive traffic flow of the masses? It's like a synchronized dance, where everyone competes for the most daring moves and the tightest squeezes. You'll witness the true artistry of lane-changing, where indicators are optional and merging is an Olympic sport. Forget about those boring road signs; they're just there for decoration.Who needs directions when you have the power of honks and hand gestures to communicate your intentions? Oh, and let's not forget the sacred tradition of double parking. It's a creative masterpiece, where two cars ...

सुखाची ओंजळ

Image
"कितीही लवकर निघालो तरी काही ना काही प्रोब्लेम्स निर्माण होतच राहतात...." असे मनाशी पुटपुटत शिरीष मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये शिरला.नेहमीप्रमाणे स्टेशन माणसांच्या गर्दीने ओथंबलेले होते.बाकी काही कां असेना मुंबईत गर्दीचा तुटवडा कधीही भासत नाही.मुंबईत समुद्राच्या लाटा आणि मुंबईतील गर्दी या दोन्ही गोष्टी नेहमीच उसळत असतात. गर्दीला ढकलत, स्वतःला सावरत शिरीष तिकीट खिडकीपाशी पोहचला.... "एक व्ही.टी" "एक तास लोकल ट्रेन बंद आहे...... देऊ कां तिकीट?" "बंद आहे?" मग इतकी लोकं स्टेशनवर कशी काय?" "माहिती नसलेले तुम्ही थोडे एकटेच आहेत.तेही तुमच्यासारखेच आहेत." तिकीट खिडकीच्या आत बसलेल्या माणसाशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही हे समजल्यावर शिरीष तेथून निघून स्टेशन बाहेर आला.व्ही.टीला कसे पोहचायचो हा प्रश्न निर्माण  झाला होता.टॅक्सींंना शिरीषने हात करूनही एकही टँक्सी थांबायला तयार नाही.रस्त्यावरील प्रत्येक टँक्सी प्रवासी कवेत घेऊन धावत होती.चालत शिरीष पुढे आला.....काय करावे हे त्याला समजेना.जिग्नेश शहाला आज भेटणे कोणत्य...

शब्दसंचय ....( संग्रह )

Image

नात्याची मखमली शाल

Image
💖नात्याची मखमली शाल💖  जन्माबरोबरच मनुष्य नात्यांच्या अनेक बंधनाची  शिदोरी सोबत घेऊन येतो.मनुष्य, मनुष्याचे कुटंब,अनेक कुटंबांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला समाज आणि अनेक समाजांच्या सुमधुर नात्यांमधून निर्माण झालेला देश.            नाते कोणतेही असो...नाते आणि झाडं यांच्यात काही गोष्टींबाबत कमालाचे साम्य असते.ज्याप्रमाणे बहर ओसरल्यानंतर झाडाला खतपाण्याची आवश्यकता असते;त्याप्रमाणे नात्यांनाही संयम,सहिष्णुता आणि आत्मियता रूपी खताची आवश्यकता असते.यासाठी एकमेकांची विचारपूस केली पाहिजे... एकमेकांची काळजी घेतली पाहिजे... एकमेकांवर नियंत्रण न ठेवताही एकमेकांच्या तणावांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे ...आपलेपणा असल्याशिवाय कोणतंही नातं बहरत नाही. नाती निर्माण करता आली पाहिजेत.. नाती फुलवता आली पाहिजेत आणि त्या बहराचा आनंदही घेता आला पाहिजे.     संवेदना हा  कोणत्याही नात्याचा पाया असतो.... संवदेना म्हणजे साम आणि वेदना, म्हणजे सुख आणि दु:ख मिळून तयार झालेले रूप,जे मनुष्याला आयुष्यातील ऊन सावलीच्या भावनांशी ओळख करून देत असते.संवाद ...

पुरोगामी मुळव्याध

Image
★पुरोगामी मुळव्याध★ ज्याप्रमाणे खूप प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाण्यात आले की मनुष्याच्या शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत जाऊन,त्या वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर मुळव्याधामध्ये होते, अगदी त्याचप्रमाणे भारतातील  काही लोकांचा मोदी द्वेष हा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की त्या लोकांच्या ढुंगणाला पुरोगामीपणाचे इंद्रधनुष्यी मुळव्याध झाले आहे. या इंद्रधनुष्यी मुळव्याधाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य  हे असते की हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू सण उत्सव आणि हिंदू रीतीरिवाज या संबंधित कोणताही विषय आला की या पुरोगामी लोकांचे  पुरोगामीतत्व लाभलेले मुळव्याध ठणठणायला लागते.     मनुष्याने विज्ञानवादी असावे वगैरे सर्व काही प्रमाणात ठीक आहे... चुकीच्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत हे देखील कोणीही नाकारणार नाही.... आक्षेप या गोष्टीवर आहे की तुमचा सगळा विज्ञानवाद फक्त हिंदू धर्माबाबतच कां उफाळून येतो?        हिंदू धर्मात जात व्यवस्था आहे हे विदारक सत्य कोणीही नाकारत नाही. जात व्यवस्था हा हिंदू धर्माचा भाग कधीच नव्हता.जात व्यवस्था ही संपूर्णपणे मा...

साहेबप्रेमी -एक चित्रविचित्र जमात

Image
★ साहेबप्रेमी -एक चित्रविचित्र जमात ★ जगात अनेक अविश्वसनीय गोष्टी घडून येतील,  मुंबईत बर्फ पडू शकतो ....दक्षिण भारतात हिमालय पर्वताच्या रांगा निर्माण होतील ...पुणेकर बाहेरून पुण्यात आलेल्या  लोकांशी सौजन्याने बोलतील...देशातील भ्रष्टाचार नाहीसा होईल...एवढचं कशाला अगदी शिवसेनेचे बिनडोक समर्थक देखील समंजसपणे वागायला सुरुवात करतील...अगदी सांगायचं झालं तर आपल्या देशातील आजच्या सर्व प्रमुख समस्या या समाप्त झालेल्या असतील.... या सर्व गोष्टी घडून येतीलही,पण जगातील एक गोष्ट आहे, जी आकाशातील सूर्य,चंद्र आणि तारे यांसारखी अढळ आहे...जी कधीही नाहीसी होणार नाही. ती गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील साहेबप्रेमी लोकांचा बिनडोकपणा ...आणि साहेबप्रेमींच्या डोक्यात भिनलेला किंबहुना भिनवला गेलेला जातीयवाद .       यामागचे प्रमुख कारण हे आहे की या लोकांच्या नसानसात जातीयवाद भिनलेला  आहे...पश्चिम महाराष्ट्रातील साहेबांच्या पक्षाने हा जातीयवाद पोसण्यासाठी जाणिवपूर्वक  प्रयत्न केले आहेत... या लोकांना वास्तव मान्य करायचे नसते.यांच्या साहेबांची राजकीय ताकद पश्चिम महा...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोंग

Image
★अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोंग★ जेएनयूमध्ये देश तोडण्याच्या घोषणा देणाऱ्यांना नक्षलवाद समर्थक विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,.मुंबईत CAA विरोधी आंदोलनात फ्री काश्मीर असा फलक झळकवणा-यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,पण कंगणा रणावत,विक्रम गोखले यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही.       भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे.कंगणाने आज केलेल्या वक्तव्यामध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही तरी काँग्रेसला कां झोबले?तशीही कंगणा विरोधात पोलीस केस जरी नोंदवली तरी न्यायालयात ती केस एक मिनिट देखील टिकणार नाही हेही तितकेच खरे आहे.    १९४७ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता का? मग या देशाच्या राष्ट्राचा राष्ट्रपिता कोण होता? कंगनाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही? कंगनाचे वक्तव्य बेताल,मग स्वरा भास्करचं विधान काय आहे?       कोण तो कन्हैय्याकुमार कोणालाही माहित नव्हता.जेएनयूमध्ये त्याने देशविरोधी घोषणा दिल्या तेव्हा त्याला डोक्यावर घेऊन मिडीयावाले नाचले... हिंदीतील दुय्यम दर्...

राष्ट्रहित

Image
★ मी मोदींच्या सोबत....★ मोदींच्या सकाळी मनात आले... मिडीयाला ९ वाजताच्या कार्यक्रमा विषयी सांगण्यात आले... मोदी टीव्हीवर आले आणि त्यांनी शेती कायदे रद्द केले. देश चालवणे म्हणजे काय मॅगी बनवणे आहे? असे निर्णय एका क्षणात,एका दिवसात,एका महिन्यात होत नाही.त्यासाठी प्रदीर्घ काळ विस्तृत चर्चा झालेली असते.तुम्हा आम्हाला आवडो ना आवडो भारतातील राजकीय व्यवस्था जात,शेतकरी,भावना यावर चालते. देशात सुधारणा करण्यासाठी हाती सत्ता असली पाहिजे.शेती कायदे रद्द न करता आगामी काळात१० वर्षे सत्ता काँग्रेसकडे सोपवण्यापेक्षा शेती कायदे रद्द करणे हाच योग्य निर्णय होता हे नंतर सर्वांनाच लक्षात येईल.       मोदींनी एखादा निर्णय मागे घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.२०१५ साली  जमीन सुधारणा कायदा मोदींनी मागे घेतला होता. तेव्हाही मोदींवर टीका झाली,पण त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती होत भाजप पुन्हा २०१९ साली सत्तेवर आला.राजकारणात परिस्थितीचा सारासार अभ्यास करुन काही वेळेला माघार घ्यावी लागते.          ज्यांना थोडीफार राजकीय आणि व्यवहारिक समज आहे त्यांना मोदींनी  शेती कायदे...

सुंदर खासगीकरण

Image
गचाळ सरकारी कारभार आणि खासगीकरण यातील फरक पाहण्यासाठी मरिन ड्रायव्हवर या.काही महिन्यांपूर्वी ज्या एअर इंडिया बिल्डिंगवरील बर्ड देखील अंधारात असायचा तेथे टाटा ग्रुपने एअर इंडिया विकत घेतल्यानंतर आज  दृश्य आहे. सध्या मी तेथेच आहे. लाईव्ह रिपोर्टिंग

मनमोहक संध्या

Image
कालचा संध्याकाळचा मरीन ड्रायव्हचा सूर्यास्त वेगळेच सौंदर्य घेऊन आला होता. समुद्राच्या अथांग पसरलेल्या लाटांवर सूर्यास्त सुंदरतेने विसावलेला होता..... जसे दिवसभराच्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने घरातील वडीलधारी व्यक्ती व्हरांड्यातील खुर्चीवर आरामात पाय सोडून बसते.

मिठी

Image
★मिठी ★ भावनांच्या आकाशाखाली मनाच्या कठड्यावर बसून तुझ्या चेहऱ्यावर नजरेच्या स्पर्शाने हळुवारतेची रांगोळी काढावी....लज्जेच्या भाराने झुकलेल्या पापण्यांची हालचाल टिपावी.....तुझ्या गालांचे बदलत जाणारे रंग निखरावे....थरथरत्या तुझ्या हातांच्या हुरहुरतेला माझ्या हातांचा आधार द्यावा..हातांच्या स्पर्शाने तुझ्या डोळ्यात चमकलेले काहुरतेचे चांदणे...पहाटेच्या दवबिंदूंच्या सानिध्यात हळूच उघडणाऱ्या  कळ्यांप्रमाणे,हळूच एकमेकांपासून अलग होणारे तुझे डाळिंब ओठ....अर्धा चेहरा ताब्यात घेतलेल्या केसांच्या आच्छादनाखाली लपाछपी खेळणाऱ्या तुझ्या कपाळाच्या क्षितिजावर अलगद उमटावे मी माझ्या ओठांचे इंद्रधनुष्य... तू नकाराची कडी दाराला लावण्यापूर्वीच मी माझ्या हातांचा दरवाजा उघडावा अन् तुला खेचून घ्यावे मनाच्या परिघात ! मग माझ्या हातांचा दरवाजा मी खट्याळतेने बंद करावा. - मनोज राणे